28-Mar-2022
5 Thane (Maharashtra)

ऑल मिडिया प्रेस असोसिएशन संघटनेच्या महाराष्ट्र राज्याची कार्यकारिणी घोषित. 

 ठाणे 

    ऑल मिडिया प्रेस असोसिएशनची बैठक आनंद निलायम सिनियर सिटीझन होम खोपोली येथे संपन्न झाली.या बैठकीत महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली.
    सदर नियुक्ती ऑल मिडिया  प्रेस असोसिएशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री.मुकेश कुशवाह यांच्या आदेशानुसार मध्य भारताचे अध्यक्ष श्री.डाॅ.ज्योतीप्रकाश बापू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली.
  यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी श्री.सचिन शिंदे (ठाणे) ,उपाध्यक्ष पदी श्री. कृष्णाथ (दादासाहेब) चोरमले (फलटण, सातारा), सचिव पदी श्री.गणेश जाधव(सातारा), कोषाध्यक्ष पदी श्री.अशोक पवार (पंढरपूर), मिडिया प्रसिद्धी प्रमुख म्हणुन श्री.तानाजी सुतकर (पंढरपूर), राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून श्री.शशिकांत शिंदे (वाई,सातारा), श्री.रज्जाकभाई मुजावर (मंगळवेढा, पंढरपूर), श्री.संतोष मराठे (मुंबई) तर महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षपदी अमिता कदम (ठाणे) आणि उपाध्यक्ष पदी नम्रता चव्हाण (यवतमाळ) यांची नियुक्ती करण्यात आली.
   यावेळी ऑल मिडिया प्रेस असोसिएशनचे मध्य भारत अध्यक्ष डॉ ज्योतीप्रकाश बापू यांनी संघटनेची ध्येय धोरणे सांगितली तसेच महाराष्ट्रात संघटना वाढीसाठी काय प्रयत्न केले पाहिजेत याबद्दल नियुक्त पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले.
  ऑल मिडिया प्रेस असोसिएशन संघटनेमार्फत लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात जिल्हा आणि तालुका स्तरावर पदाधिकारी नियुक्त करण्यात येतील असे जाहीर करण्यात आले.